मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन 3 कोटीत बिल्डरला, काँग्रेसचा आरोप भाजपने फेटाळला

Continues below advertisement
काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप केलाय. नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसनं केलाय. सीडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत तब्बल १ हजार ७६७ कोटी रुपये असताना, ती फक्त साडे तीन कोटी रुपयांत बिल्ड़र मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. हे बिल्डर भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र आहेत. इतकच नाही तर ते भागिदारही असण्याची शक्यता काँग्रेसनं व्यक्त केलीय. १४ मे रोजी या जमीनीचं हस्तांतरण झालं. त्याच दिवशी जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्णी बिल्डरांना मिळाली. या प्रक्रियेला अनेक महिने लागत असताना त्याच दिवशी हे कसं शक्य झालं, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादानेच हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. दरम्यान, भाजपने पत्रकार परिषद घेत काँग्रेससचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्ररकरणी भाजप काँग्रेसविरोधात 500 कोटींचा अब्रूनुकसानिचा दावा ठोकणार आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram