मुंबई : घरगुती गॅस २ रुपये ७१ पैसे, तर विनाअनुदानित गॅस ५५ रुपयानी महागला
Continues below advertisement
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये २ रुपये ७१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत ५५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानं नीचांक गाठल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
Continues below advertisement