मुंबई :लोअर परेल पूल बंद, वळसा घालण्याशिवाय पर्याय नाही!

मुंबईतील लोअर परेलचा रेल्वे पूल आजपासून वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी बंद केल्याने त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. लोअर परेल रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी झाली असून गोंधळाचं वातावरण आहे.
गर्दीमुळे प्रवाशांचा आरडाओरडा सुरु आहे. लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola