मुंबई : लोअर परेलच्या ब्रिजमुळे मोठी कोंडी, कॉर्पोरेट कंपन्यांच्या वेळा बदलण्याची मागणी
Continues below advertisement
तुम्ही जर लोअर परळमधील कंपन्यांमध्ये काम करत असाल तर तुमच्या कामाच्या वेळा बदलल्या जावू शकतात. कारण लोअर परळचा धोकादायक पूल बंद करण्यात आल्यापासून नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या परिसरातून चालताना अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठावे लागत आहे. त्यामुळे आता कॉर्पोरेट कंपन्यांच्या वेळा बदलण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Continues below advertisement