नवी दिल्ली : पालकांच्या संमतीशिवाय मुलींच्या लग्नाचं वय 21 करा : भाजप खासदार गोपाळ शेट्टी
Continues below advertisement
महिला दिनादिवशीच मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.आई-वडिलांच्या समंतीशिवाय लग्न करायचं असल्यास मुलींसाठी लग्नाचं वय 21 वर्षे करा, अशी मागणी शेट्टींनी केली. विशेष म्हणजे, आई-वडिलांच्या संमतीनं लग्न करण्यासाठी वयाची अट 18 वर्षच असावी, असा अजब तर्कही त्यांनी मांडला आहे. यासंदर्भात गोपाळ शेट्टी संसदेत खासगी विधेयकही सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाहसुद्धा मोठी समस्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे जातीपातींच्या उच्चाटनासाठी लढे सुरु असताना भाजप खासदारांचं विधान पुन्हा समाजाला बुरसटलेल्या विचारसरणीकडे घेऊन जाणार आहे.
Continues below advertisement