मुंबई/लातूर : निलंगेकर बँकेचे जावई आहेत का? : जितेंद्र आव्हाड
संभाजी पाटील निलंगेकर बँकेचे जावई आहेत का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तर शेतकऱ्यांना कधी मदत मिळत नाही, मात्र निलंगेकरांना कसे 41 कोटी माफ होतात अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.