
मुंबई: एक्स्प्रेस वेवर सैल झालेल्या दरडी काढण्याचं काम सुरु
Continues below advertisement
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सैल झालेल्या दरडी काढण्याचं काम सुरु आहे. त्यामुळं तर एक तासानं १० मिनिटांसाठी महामार्गावरची वाहतूक थांबवण्यात येत आहे. आडोशी बोगद्याजवळ सकाळी ११ ते ४ दरम्यान हे काम सुरु राहणार आहे. त्यामुळं आज तुम्ही मुंबई- पुणे महामार्गावर प्रवास करत असाल तर काही काळ तुमचा खोळंबा होऊ शकतो
Continues below advertisement