Kulbhushan Jadhav | आज कुलभूषण जाधवांचा फैसला, मित्रांना काय वाटतं? | ABP Majha
Continues below advertisement
मूळचे मुंबईकर असलेले कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द होणार की नाही याचा आज फैसला होणार आहे. फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या या प्रकरणावर आज आंतरराष्ट्रीय न्यायालय फैसला सुनावणार आहे. भारतीय वेळेनुसनार संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत 16 न्यायमूर्तींचं खंडपीठ अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरोधात हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आलीय. एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानातल्या न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायलयात धाव घेतली. त्यानंतर 18 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापली बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर मांडलीय..
आजच्या फैसल्याच्या पार्श्वभूमीवर कुलभूषण जाधवांच्या मित्रांनी काय प्रतिक्रिया दिलीय, पाहुयात
आजच्या फैसल्याच्या पार्श्वभूमीवर कुलभूषण जाधवांच्या मित्रांनी काय प्रतिक्रिया दिलीय, पाहुयात
Continues below advertisement