मुंबई : पहिला विमान प्रवास करणाऱ्या कोल्हापूरकरांशी एक्स्क्लुझिव्ह बातचित
Continues below advertisement
गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात झाली. पहिल्या विमानप्रवासात शेतकरी, अपंग, अनाथ मुलं आणि कचरा वेचणाऱ्या महिलांना प्रवास करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे हे प्रवासी चांगलेच आनंदी झाले होते. कधी विमानात बसण्याचं स्वप्नही न पाहिलेल्या या प्रवाशांना आज हवाई सफरीचा प्रत्यक्षात अनुभव घेता आला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
Continues below advertisement