मुंबई : ‘तुंबापुरी’चा शिक्का पुसण्यासाठी बीएमसी किर्लोस्कर ब्रदर्सची मदत घेणार
Continues below advertisement
राजधानी मुंबईला पुराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महापौर निवासात यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली असून, यात किर्लोस्कर ब्रदर्सच्या विविध उपाययोजनांचं सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर लवकरच संबंधित योजनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. किर्लोस्कर बदर्सनी विविध देशांत पूर नियंत्रण प्रणाली यशस्वीपणे राबवली आहे. थायलंडमध्येही भूगर्भात बोगदा तयार करुन बँकॉक शहराला पुरापासून वाचवण्याची कामगिरी किर्लोस्कर ब्रदर्सने केलीय. याच धर्तीवर मुंबईसाठीही एक योजना तयार करण्याबाबत मार्गदर्शन करावं, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किर्लोस्कर ब्रदर्सकडे केला होता.त्याला प्रतिसाद देत किर्लोस्कर कंपनीचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी तज्ञ सहकाऱ्यांसह या बैठकीत मार्गदर्शन केलं.
Continues below advertisement