मुंबई | खंबाटा एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचं पुनर्वसन न झाल्याने 500 कामगारांचं आमरण उपोषण
Continues below advertisement
खंबाटा एअरलाईन्स कंपनी बंद होऊन दोन वर्ष उलटलेत मात्र कामगारांचं अद्यापही पुनर्वसन झालं नाहीय. याविरोधात पाचशेपेक्षा जास्त कामगारांनी सहार रोड परिसरात आंदोलन सुरु केलंय. या आंदोलकांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाठिंबा दिलाय. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार विनायक राऊत आणि कंपनी अधिकारी यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा कामगारांनी दिलाय.
Continues below advertisement