मुंबई: काशिमीरा परिसरात दोन गटात तुफान हाणामारी
मीरारोड मधील काशिमीरा परिसरात काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दहा ते बारा जण गंभीर जखमी झालेत. तर अनेक गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. काही उत्तर भारतीय आणि आदिवासी यांच्यात जमिनीच्या वादावरून तणावाचं वातावरण होते. काल या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. एका गटानं दुसऱ्या गटाच्या वस्तीवर हल्ला चढविला. यात लाठ्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले. एवढंच नाहीतर इतर गाड्यांसह पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात अली.. घटनस्थळी पोहचलेल्या बिट मार्शलच्या गाड्यांची तोडफोड या जमावाने केली. अखेर रॅपिड एक्शन फोर्स आणि राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्या या विभागात तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या विभागात तणावपूर्ण वातावरण आहे.