मुंबई : मुंबई शिक्षक मतदार संघात कपिल पाटील विजयाच्या उंबरठ्यावर, पदवीधरमध्ये पोतनिस आघाडीवर

Continues below advertisement
मुंबई शिक्षक मतदारसंघातून सलग तिसऱ्यांना कपील पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कारण, या निवडणुकीत सर्वाधिक मतं कपिल पाटील यांनी मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतलीय. त्यामुळे शिवसेनेनं मुंबई पदवीधरचा गड राखल्याचं बोललं जात आहे. तिकडे कोकण पदवीधरमध्ये सुरुवातीला शिवसेनेचे संजय मोरे पुढे होते. मात्र २८ हजार मतांची मोजणी झाल्यानंतर भाजपचे निरंजन डावखरे यांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे तिसऱ्या स्थानी आहेत. मात्र, या तिनही उमेदवारांमध्ये मतांचं अंतर खूप कमी असल्यानं इथं काटें की टक्कर पाहायला मिळतेय. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे ५ हजार ७२५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत टीडीएफचे संदीप बेडसे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर भाजपचे अनिकेत पाटील शेवटच्या नंबरवर फेकले गेलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram