मुंबई : कमला मिल प्रकरणाची स्वतंत्र समितीमार्फत चौकशीचे हायकोर्टाचे आदेश, बीएमसीचा विरोध
Continues below advertisement
कमला मिल आग प्रकरणाची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. निवृत्त न्यायामुर्तींच्या अध्यक्षतेखाली आठवड्याभरात ही समिती स्थापन करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. या समितीत हायकोर्टाच्या पॅनलवरिल आर्किटेक्ट, नगर विकास खात्याची सचिव दर्जाची व्यक्ती यांचा समावेश असेल. पण मुंबई महापालिकेने मात्र या चौकशीला विरोध केलाय. याप्रकरणी मनपा आयुक्तांनी चौकशी अहवाल तयार केला आणि पुढील कारवाई सुरु असल्याने चौकशीची गरज नसल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. याचिकाकर्ते जुलिओ रिबेरो यांनी चौकशी आयोग नेमण्याची मागणी केली होती.
Continues below advertisement