अग्नितांडवानंतर कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर कारवाई

कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. ही कारवाई आजही सुरु राहणार आहे. कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं पथक यासाठी तयार करण्यात आलं आहे. महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम आणि निहमबाह्य व्यवस्थापन असणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola