मुंबई : कल्याणमध्ये पहिल्यांदाच रंगला एअर शो
Continues below advertisement
कल्याणच्या बिर्ला कॉलेजच्या प्रांगणात आयोजित एअर शोला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शोदरम्यान अहमदनगरच्या यश जहागीरदार यांनी आपल्या कलेक्शनमधली अनेक विमानं उडवून दाखवली. यात फायटर प्लेन, इलेक्ट्रिक मोटारवालं विमान, ग्लायडर विमान, उडती तबकडी, पुष्पवृष्टी करणारं विमान, टेहळणी आणि एरियल फोटोग्राफीचं विमान अशा अनेक विमानांचा समावेश होता. विविध शाळांचे जवळपास आठ हजार विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान विमानं नेमकी कशी तयार होतात आणि उडतात यासाठी कल्याणात जानेवारी महिन्यापासून प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे वैमानिक होऊन गगनभरारी घेण्याची अनकांचं स्वप्न नक्कीच पूर्म होईल
Continues below advertisement