मुंबई : काळाचौकीत घराखालची जमीन खचून 20 फुटांचा खड्डा, जीवितहानी नाही

Continues below advertisement
मुंबईतल्या काळाचौकी परिसरात असलेल्या वेस्टन इंडिया मिळ चाळीत एका घराखालची जमीन खचून 15 ते 20 फूट खोल खड्डा पडलाय. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी एक घर पूर्णतः या खड्ड्यात ढासळले आहे. गेल्या आठवड्याभरात या चाळीत घर खचण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या बुधवारी याच चाळीतील एका घरात असाच खड्डा पडून त्यात चार जण अडकले होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या परिसरात सध्या मुंबई महापालिकेचं मलनिस्सारण आणि पर्जन्यजलवाहिन्या टाकण्याचं काम सुरु आहे...या कामामुळे जमिनीला हादरे बसत असल्यानं इथली जमीन खचतेय असा दावा इथल्या रहिवाश्यांनी केलाय. तर घरं खचण्याचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाहीये, असं पालिकेचं म्हणणं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram