VIDEO | काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला सुरूवात, कलाकृतींच्या माध्यमातून महात्मा गांधींना मानवंदना | मुंबई | एबीपी माझा
कलेची मेजवानी असलेल्या मुंबईतील काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला आजपासून सुरूवात झालीय. या सोहळ्याचे हे 20 वे वर्षे आहे. कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, संगीत यासह अनेक कलागुण या सोहळ्यात पहायला मिळतात. महात्मा गांधीं यांच्या 150 व्या जयंतीच्या औचित्याने नानाविध कलाकृतींच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली जातेय. 10 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याची मजा मुंबईकरांसह कलाप्रेमींना लुटता येणार आहे. आजपासूनच मुंबईकरांनी काळा घोडा येथे गर्दी करायला सुरूवात केलीय.