VIDEO | बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, भीमगीतांच्या माध्यमातून कडूबाईंचं अभिवादन | एबीपी माझा
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत. सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चैत्यभूमीवर येत बाबासाहेबांना अभिवादन केलं. अनेक राजकीय नेतेही चैत्यभूमीवर आले होते.