मुंबई : वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही : अनुज लोया
वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही. त्यामुळे कृपया मला आणि आमच्या कुटुंबीयांना या प्रकरणात ओढू नका, अशी विनंती जस्टिस बी. एच. लोया यांचा मुलगा अनुज लोयाने केली आहे.
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अनुजने आपली बाजू मांडली. ''कुटुंबाला या सर्व परिस्थितीचा त्रास होतोय. या प्रकरणात अगोदर संशय वाटला होता, मात्र नंतर सर्व स्पष्ट झालं. त्यामुळे आम्ही क्लिअर आहोत. कुणावरही संशय नाही, या प्रकरणात कृपया आम्हाला ओढू नका'', अशी कळकळीची विनंती अनुजने केली.