मुंबई : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना तब्बल 200 टक्के वेतनवाढ
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालय आणि 24 उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनात 200 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या वेतनात वाढ केल्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचा पगार प्रतिमहिना 1 लाख रुपयांवरून थेट पावणे तीन लाख रुपये होणार आहे.
या वेतनाव्यतिरिक्त त्यांना सरकारी निवासस्थान, गाडी आणि कर्मचा-यांसह इतरही भत्ते मिळणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांचं वेतन प्रतिमहिना 90 हजार रुपयांनी वाढून अडीच लाख रुपयांपर्यंत जाणार आहे.
तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन 80 हजारांवरून 2 लाख 25 हजारांवर जाणार आहे.