मुंबई : मराठी वृत्तवाहिनीच्या अँकरला एक्स्प्रेस वेवर लुटलं
Continues below advertisement
पुण्यातल्या स्वारगेटमधून खासगी प्रवाशी कारने नवी मुंबईच्या खारघरमध्ये येणाऱ्या मराठी अँकरला कारमधील चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्रकार गिरीश निकम वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला गेले होते...खारघरला परतण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर ते थांबले होते.. उशीर होत असल्याने त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या खासगी कारमधून त्यांनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला.. कारमध्ये चालकासह चार जण बसले होते. मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर कार चालकाने लंघुशंकेच्या निमित्ताने कार थांबवली.
गिरीश यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल फोन तसेच रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर लुटारुंनी एटीएम कार्डचा पासवर्ड विचारुन घेतला. आणि एटीएममध्ये जाऊन 41 हजाराची रोख रक्कम काढून घेतली. अज्ञात आरोपींविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..