मुंबईत JVLR वर कारची जोरदार धडक, तरुणी कोमात | मुंबई | एबीपी माझा

Continues below advertisement
भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेली पादचारी तरुणी कोमात गेली आहे. मुंबईतील जेव्हीएलआरवर दुर्गानगरजवळ हा भीषण अपघात घडला. अपघाताची दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. सायली राणे नावाची 24 वर्षीय तरुणी मैत्रिणीकडून घरी परत येत होती. त्यावेळी ती जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर चालत असताना इटिऑस कारने तिला जोरदार धडक दिली. जेव्हीएलआरवर दुर्गा नगरजवळ ही घटना घडली. इटिऑस कारने धडक दिल्यानंतर सायली काही फूट उडाल्याचं, या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. धडक दिल्यानंतर कारसुद्धा समोरच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. कारच्या धडकेत जखमी झालेली सायली कोमात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram