मुंबई : जेईई मेन आणि नीट परीक्षा वर्षातून दोनदा, करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
इंजीनिअरींग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यावर्षीपासून नीट आणि जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहेत. तशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलीय. नीटची परीक्षा फेब्रुवारी आणि मे तर जेईईची परीक्षा जानेवारी आणि एप्रिल महिन्यात होणार आहेत. सध्या या परीक्षा सीबीएससी बोर्डाकडून घेण्यात येते. मात्र, आता ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतल्या जाणार आहेत. या दोन्ही परीक्षांमधील ज्या परीक्षेत परीक्षार्थ्याने जास्त गुण मिळवले असतील ते गुण ग्राह्य धरले जाणार असल्याची माहितीही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram