मुंबई : 2002-2003 बॉम्बस्फोट प्रकरण : शाकीबची 5 महिने आधी सुटका

Continues below advertisement
2002 आणि 2003 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शाकीब नाचन याची कारागृहातून सुटका झालीय. चांगल्या वागणुकीमुळं शाकीब 5 महिने 13 दिवस आधीच कारागृहातून बाहेर आलाय.  2002 आणि 2003 मध्ये मुंबई सेंट्रल, विले पार्ले आणि मुंलुंड या तीन ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले होते. मुंबई सेंट्रलच्या मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये, विलेपार्ले स्टेशनबाहेर सायवलवर आणि मुंलुंडला सीएसटी-कर्जत लोकलमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यात 13 लोकांचा मृत्यू तर 147 जण जखमी झाले होते. याप्रकरणी शाकिब नाचनसह 9 जणांना दोषी ठरवण्यात आलं होत. यात शाकिबला 10 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram