Vidhan Sabha 2019 | रवी राणा आणि गीता जैन यांचा भाजपला पाठिंबा | ABP Majha

Continues below advertisement
विधानसभा निवडणुकीआधी भाजप-शिवसेनेतील अनेकांनी तिकीट वाटपावरुन नाराजी व्यक्त बंडखोरी केली होती. त्यातील काही जण निवडूनही आले आहेत. या बंडखोरांच्या समर्थनासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, गीता जैन यांनी निकाल लागल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. बंडखोरांना युतीत स्थान दिलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी म्हटलं होतं. मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेची गणितं जुळवण्यासाठी आता बंडखोरांचा भाव वधारला असल्याचं दिसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram