मुंबईतील अंधेरी स्टेशनवर महिलांसाठी खास जिना आरक्षित
मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अंधेरी स्टेशनसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनवरील एक जिना महिलांसाठी आरक्षित केला जाणार आहे.
गर्दीच्या वेळी फुटओव्हर ब्रिजला जोडणारा जीना गर्दीच्या वेळी खास महिलांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय अंधेरी स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आहे.