मुंबई : हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील ताट नॉन व्हेज खाण्यासाठी वापरु नका, आयआयटी मुंबईचा फतवा
आयआयटी मुंबई सारख्या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत मांसाहारी विद्यार्थ्यांना दिलेल्या आदेशामुळे सर्वांचे कान टवकारले आहेत. तुम्हाला हॉस्टेलमध्ये नॉन व्हेजमध्ये खायचं असेल, तर मेसमधील मुख्य ताटांमध्ये जेवू नका, असा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.