पुणे : फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा

Continues below advertisement

तुम्ही शाकाहारी असाल तरच तुम्हाला पुणे विद्यापीठात सुवर्णपदक मिळू शकतं. कारण तसा अजब फतवाच पुणे विद्यापीठानं काढला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट त्यात आहे. पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली आहे. विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थी या पदकासाठी पात्र असेल. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram