पुणे : राज्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरु

राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झालीय. तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले आहेत. यावेळी साडेदहापर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यंदाच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. यंदा राज्यात २५२ भरारी पथकं असणार असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ पथकं देण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिकांची आदलाबदल टाळण्यासाठी सर्वांवर आधीच बारकोडची छपाई करण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola