स्पेशल रिपोर्ट : कमला मिल्स कंपाऊंडला आग : तक्रारीनंतरही महापालिकेनं कारवाई का केली नाही?
कमला मिल्स दुर्घटनेनंतर प्रश्न असा आहे, की ही दुर्घटना टाळता आली असती का? या प्रश्नाचं उत्तर आहे. हो... नक्कीच टाळता आली असती... पण राजकीय अनास्था... अधिकाऱ्यांची बेफिकिरी... आणि कायद्याला खिशात घेऊन फिरणारे लोक... यामुळे हा अपघात अटळ ठरला... वारंवार केलेल्या तक्रारींकडे जरा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं असतं... तर आज 14 जण आपल्या प्राणांना मुकले नसते...