ABP News

मुंबई : प्लास्टिकबंदीनंतर हॉटेलमध्ये कार्डबोर्ड, अॅल्युमिनियम कंटेनरचा वापर

Continues below advertisement
प्लास्टिकबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांची आणि खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यातच पार्सल नेणाऱ्या ग्राहकांचा खिसा आणखी कापला जाण्याची शक्यता आहे कारण, पार्सलसाठी आता प्लास्टिकबंदी असल्याने प्लास्टिक कंटेनर वापरता येणार नाहीत. त्यामुळे हॉटेलमधील पार्सलवर पर्याय म्हणून कार्डबोर्ड कंटेनर आणि अॅल्युमिनियम कंटनेर वापरण्यात येत आहेत. साधारणत: 10 ते 14 रुपये किमतीचे हे कार्डबोर्ड कंटेनर आहेत, याची किंमत मूळ खाद्यपदार्थांच्या किमतीसोबत लावली जावू शकते. साहजिकच खाद्यपदार्थांच्या किमती यामुळे वाढणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram