मुंबई : काळाचौकी येथे चाळीतील घर खचले; 4 जण थोडक्यात बचावले
Continues below advertisement
वडाळा येथील रस्ता खचल्याची घटना ताजी असताना काळाचौकीतही घरातील जमीन खचण्याचा प्रकार समोर आला आहे. काळाचौकी भागातील अभ्युदय नगरमध्ये वेस्टर्न इंडिया चाळीत घरात जमीन खचल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात 4 जण अडकले होते. स्थानिकांनी आणि पोलिसांनी शिडी आणि दोरीच्या साहाय्याने या चौघांना खड्ड्याबाहेर काढले आहे.
Continues below advertisement