मुंबई : वडील आठ वर्षांपासून बेघर, बोभाटा होताच मुलाला अद्दल

Continues below advertisement
वडिलांची जबाबदारी घेतली नाही म्हणून होर्डिंग्स लावून मुलाला समज देण्यात आली आहे. मुंबईतल्या वर्सोव्यात राहणारे 72 वर्षीय शंकर वाघमारे यांना त्यांच्या पोटच्या मुलानंच घरातून हाकलून दिलं. काही दिवसांनी वाघमारे यांनी भाजप आमदार भारती लव्हेकर यांच्याकडे मदतीसाठी हात पसरले. यावर लव्हेकर यांनीही शक्कल लढवली. लव्हेकर यांनी या घटनेचे होर्डिंग्स लावून मुलाचे प्रताप चव्हाट्यावर आणले. अखेर अब्रु चव्हाट्यावर आल्यानंतर मुलानं आपल्या वडिलांना पुन्हा घरात घेतलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram