मुंबई : अपघातात जखमी डॉक्टर दीपालीचा उपचारादरम्यान मृत्यू

Continues below advertisement
मुंबईतल्या भरधाव कारच्या धडकेत जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या डॉ. दीपाली लहामटेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 24 मार्च रोजी आपल्या भावाला डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चाललेल्या दीपालीला मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर शिखा जव्हेरी या तरुणीने भरधाव गाडीने धडक दिली. पण सुमारे 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दीपालीची प्राणज्योत मालवली. येत्या काही महिन्यातच दीपाली डॉक्टर होणार होती. पण या अपघातानं लहामटे कुटुंब पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram