मुंबई : पहिल्याच पावसात हिंदमाता, परळ, लालबागमध्ये पाणी तुंबलं!
Continues below advertisement
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने मुंबईतल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. परळ, लालबाग, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. रस्त्यावर पाणी साठल्याने काही ठिकाणी गाड्याही बंद पडल्या. त्यामुळे केवळ काही तासांच्या पावसाने मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी साठल्याने मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे.
Continues below advertisement