मुंबईचा पाऊस : मुसळधार पावसामुळे हिंदमाता भागात पाणी साचलं
Continues below advertisement
सर्वांना प्रतिक्षा असणारा मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतल्या हिंदमाता, किंग्ज सर्कल भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 12 जूनपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडण्याची शक्यता आहे. तर पावसाचा परिणाम मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवरही झालेला दिसतोय.. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशीरानं सुरु आहे...
Continues below advertisement