मुंबई : विरोध डावलून फायर ब्रिगेड स्टेशनचा पालिकेचा घाट, हायकोर्टानं फटकारलं
Continues below advertisement
मुंबईत रहिवाशांचा विरोध डावलून फायर ब्रिगेड स्थानक उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिका प्रशासनाला हायकोर्टानं चांगलंच फटकारलं. मलबार हिलमधील रहिवाश्यांनी काम थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याबाबत निर्णय देताना कोर्टाने पालिका प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईच्या रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य वाढतंय, अपघातात लोकांचे जीव जात आहेत आणि तुम्हांला फायर ब्रिगेडची पडली आहे. आधी इतर समस्यांकडे गांभीर्याने पाहा अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला खडसावलं. प्रियदर्शनी पार्कचा भूखंड हा फायर ब्रिगेडसाठी राखीव आहे असा दावा करत पालिकेनं तिथ उभारण्यात आलेला जॉगिंग ट्रॅक बेकायदेशीर असल्याचा आरोप हायकोर्टात केला होता.
Continues below advertisement