मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी हायकोर्टात याचिका
Continues below advertisement
कमला मिलमधील ट्रेडहाउस येथील 'वन अबव्ह' आणि 'मोजोस ब्रिस्टो' पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्यात. तर दुसरीकडे बीएमसीने कमला मिल कंपाऊंडमध्ये सुरू केलेल्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाद मागणाऱ्या 'स्मॅश' या स्पोर्ट्स बारला दिलासा देण्यासही हायकोर्टाने स्पष्ट नकार दिलाय.
कमला मिलमध्ये लागलेल्या आगीची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी 18 वर्षीय गर्व सूद नावाच्या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांच्यावतीनेही यासंदर्भात एक याचिका सादर करण्यात आलीय. सध्या मुंबई उच्च न्यायालयाचं सुट्टीकालीन खंडपीठ कार्यरत असल्याने या याचिकांवर 4 जानेवारी रोजी नियमित खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.