मुंबई : मुंबईकरांच्या ताटातील भेसळयुक्त पदार्थ रोखण्याची जबाबदारी कुणाची? हायकोर्टाची विचारणा
मुंबईकरांच्या ताटात भेसळयुक्त अन्नपदार्थ जात नाही ना हे पाहण्याची जबाबदारी मुंबई पालिकेची नाही का... असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलाय... विषारी किटकनाशकांमुळे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतय...नागरिकांची काळजी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालिका प्रशासन आणि राज्य सरकारचीच असल्याचं मुंबई हायकोर्टानं सुनावलं आहे. यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत याचं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.