VIDEO | सीएसएमटी स्थानकावर हेरिटेज गल्ली अवतरली | मुंबई | एबीपी माझा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हेरिटेज गल्ली अवतरली आहे... निमित्त आहे भारतीय रेल्वे हेरेटेज सप्ताहाचं... रेल्वेचा इतिहास प्रवाश्यांना कळावा यासाठी ही हेरिटेज गल्ली तयार करण्यात आली आहे. यानिमित्त अति दुर्मिळ असे 2 इंजिन आणि 2 अतिशय जुने डबे प्रवाशांना बघण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. 1976 चे डब्ल्यूसीजी 2 इंजिन, बार्शी लाईट रेल्वेचे वाफेवर धावणारे अतिशय जुने असे एफ क्लास इंजिन, 1930 सालचे 2 कोच ठेवण्यात आले आहेत.