मुंबई : येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होण्याच्या मार्गावर आहे. मध्यरात्रीपासून मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचलं आहे. हवामान विभागानं 12 तारखेपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.