मुंबई : दोन दिवसात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
पुढच्या दोन दिवसात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज आणि उद्याही याठिकाणी मुसळधार पाऊस होईल, अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. विदर्भातल्या अमरावती, बुलडाणा, गोंदियातही मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर नांदेडसह मराठवाड्याच्या भागात सरी बरसतील असाही अंदाज आहे. तर मुंबईत दोन दिवसांपासून पाऊस थांबलाय.. वारे अरबी समुद्राकडून बाष्प घेऊन येत असल्यानं मुंबईचंही तापमानही कमालीचं वाढलं आहे.