मुंबई : मुंबईसह महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ, पुढील 24 तास उष्णतेच्या लाटेचा इशारा

Continues below advertisement
उष्णतेच्या झळांनी मुंबईसह अवघा महाराष्ट्र पुरता होरपळून निघतोय..काल मुंबईत तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणि जगातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत मुंबई आठव्या स्थानी राहिली. तिकडं विदर्भातही तापमान तब्बल 3 ते 6 अंशांनी वधारले आहे. अकोल्याचा पारा तब्बल 40.5 अंश सेल्सिअस राहिला. रायगड जिल्ह्यातल्या भीरामध्ये तब्बल 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..
तिकडं तळकोकणातही तब्बल 42 अंश कमाल तापमानाची नोंद झाली.
पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळं तापमानात ही कमालीची वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच येते 24 तास मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram