मुंबई | HDFC चे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवींच्या हत्येचा उलगडा
एचडीएफी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या चोरीच्या उद्देशातून झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. कौपरखैरणेच्या सरफराज शेखने ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. सिद्धार्थ संघवी हे बुधवारपासून बेप्पता होते. त्यानंतर शनिवारी त्यांची कार नवी मुंबईच्या कौपरखैरणेत मिळून आली. याच आधारे पोलिसांनी तपास करत सरफराज शेखला बेड्या ठोकल्या.आज सिद्धार्थ संघवींचा यांचा मृतदेह कल्याणमधूल हाजी मलंग रोडवरील एका डबक्यात कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मिळून आला. पैशांची गरज असल्याने चोरीच्या उद्देशाने कमला मिल कंपांडच्या पार्किंगमध्येचं संघवींच्या हत्या केल्याची कबुली सरफरजाने दिलीय दरम्यान, ही हत्या बँकेतल्या प्रमोशनच्या वादातून झाली असावी असा कयास काढण्यात आला... पण नंतर आरोपीच्या कबुलीतून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय.. पण या दाव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.