मुंबई : HDFC च्या चेक डिलिव्हरी बॉईजचा संप, मनसेचाही पाठिंबा

Continues below advertisement
आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा-खर्चाचा हिशेब लावण्यासाठी सर्वत्र आकडेमोड सुरु आहे. बँकांची तर घाईगडबड सुरु आहे. मात्र एचडीएफसी बँकांचे चेक डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप केलाय..
पगारवाढीसाठी हा संप पुकारला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. चेक डिलीव्हरी बॉय डिपॉझीट बॉक्स, एटीएम आणि अन्य ठिकाणी जमा झालेले चेक बँकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. मात्र, आता या संपामुळे शेकडो कोटी रुपयांचे चेक संबंधित खात्यात जमा होऊ शकलेले नाहीत. कारण आंदोलक डिलिव्हरी बॉईजकडे थोडे थोडके नव्हे तर जवळपास 800 ते 900 कोटी रुपयांचे चेक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बँकांसोबतच ग्राहकही अडचणीत आलेत. गेली अनेक वर्ष बँक आणि कंत्राटदार पगारवाढ देत नसल्यामुळं हे आंदोलन पुकारल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेने पाठिंबा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram