कर्नाटक : कुमारस्वामी यांचा शपथविधी, उद्धव ठाकरेंना आमंत्रण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुमारस्वामींचा शपथविधी आज पार पडणार आहे. बंगरुळुत संध्याकाळी चार वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कुमारस्वामी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे. कुमारस्वामी आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी फोनवरुन चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुमारस्वामी यांना शुभेच्छा दिल्या, पण पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे शपथविधीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं सांगितलं.