मुंबई : महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गटारांमध्ये फळ-भाज्यांची साठवणूक
वाकोल्यात पालिकेची कारवाई टाळण्यासाठी फेरीवाले रस्त्याशेजारच्या गटारांमध्ये भाज्या आणि फळं लपवून ठेवतात. एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केलेली ही दृश्यं सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. केवळ एकच फेरीवाला नव्हे तर रांगेने सर्वच फेरीवाले अशा प्रकारे गटारीत माल ठेवत असल्याचं दिसतंय. दरम्यान, आज मुंबई महापालिकेनं या भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली आहे.