मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा, आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Continues below advertisement
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला स्मारकाचा सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाळासाहेबांचं स्मारक तयार झाल्यावर ते बघण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतील. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन वाहनतळ उभारण्याचेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासब नगरविकास खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Continues below advertisement