मुंबई : ग्रँट रोड स्थानकाजवळील पुलाला तडे गेल्याने वाहतूक वळवली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे गेले आहेत. हा पूल ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणारा आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गांद्वारे वळवली आहे. काल रात्रीच पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला आणि यावर लगेचच सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल बंद करण्यात आला . या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासणीनंतरच पुलाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.